Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

मला माहित नाही असं का होत...


कधी कधी असं का होतं कि,
सर्वच गोष्टी स्पष्ट कराव्या लागतात,
पण काही गोष्टी अशा असतात,
कि ज्या स्पष्टच करता येत नाही.

कधी कधी असं का होतं कि,
प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं,
पण काही प्रश्न असे असतात ,
कि ज्याची उत्तरे मला सापडतच नाही ,

कधी कधी असं का होतं कि,
दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा लागतो,
त्याने तसे नाही केले तर मात्र राग येतो .

कधी कधी असं का होतं कि,
दुसऱ्यात गुंतण्याची ओढ लागते ,
भावनांचा माझ्या चुरा होईल,
याची भीती सदैव वाटत राहते

कधी कधी असं का होतं कि,
संस्कार नेहमी लक्षात ठेवावे लागतात ,
जरा जरी विसरलो तर,
मात्र दुख्ख देवून जातात,

कधी कधी असं का होतं कि,
एखाद्याची आपण फार काळजी घेतो,
पण त्यातच कुठेतरी,
त्याला अतिशय दुखावून बसतो,

कधी कधी असं का होतं कि,
पावसात(प्रेम) भरपूर भिजावसं वाटतं,
सर्दी(विरह) झाल्यावर मात्र,
त्याच पावसाचा राग येतो,

कधी कधी असं का होतं कि,
मनाविरुध्ध आपण जगत असतो,
दबावाखाली किंवा प्रेमाखातर त्याच्या,
एक ओझं वाहत असतो,

कधी कधी असं का होतं कि,
वाईट माणूस नेहमी चांगलाच वाटतो ,
जवळ आलेलं चांगल्या माणसाला,
न जुमानता आपण सोडून जातो ,

कधी कधी असं का होतं कि,
मन कुणाला दाखवता येत नाही,
माझ्याकडेही आहे नाजुकस मन,
याची जाणीव करवता येत नाही,

कधी कधी असं का होतं कि,
खांद्यावर ठेवलेला प्रेमाचा हात,
ओझं वाटायला लागतो ,
पण त्याच हाताने आधार दिला,
हे मात्र आपण विसरतो,

कधी कधी असं का होतं कि,
रक्ताच्या नात्यापेक्षा दुसरी नाती,
अधिकच प्रिय वाटतात,
रक्ताच्या नात्याला विसरून माणसे,
आपल्याच मार्गाने पुढे चालत राहतात,

कधी कधी असं का होतं कि,
संस्कृती आणि आनंद यापैकी ,
एकाला निवडावे लागते,
एक जरी निवडले तरी,
दुसरे मात्र रुसून बसते

कधी कधी असं का होतं कि,
यश मिळण्यासाठी ,
वेळ आणि नशीब जमावं लागतं,
यांचे दोघांचे जमले,
तरी आपल्याला काहीच जमत नसतं

कधी कधी असं का होतं कि,
एखाद्याला समजून घेण्यासाठी ,
आपण स्वतहून कमीपणा घेतो,
पण तो मात्र फायदा घेवून,
आपलंच अधिपत्य माझ्यावर गाजवतो,

कधी कधी जीवनाची बंधने,
आनंदाला माझ्या मर्यादा घालतात,
मर्यादेबाहेर गेलो तर,
समोर माझ्या प्रश्न उभा करतात,
ज्याच्यावर आपण प्रेम करतो,
तो मात्र दुसऱ्यावर करत असतो ,
त्याच्या बरोबर खुश राहून,
नकळत मला दुःख देतो,

काही वेळा असं का होतं की,
आपण स्वार्थी होतो ,
दुसऱ्याच्या आनंदापेक्षा ,
आपण स्वताचा आनंद जास्त मानतो,

"मला माहित नाही असं का होत असतं
 पण प्रत्येकाबरोबर प्रत्येकवेळी हे असंच होत असतं
 न जाणे का होत असतं " 

3 comments: