Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

एक अनुभव असाही.................


आज बसल्या बसल्या
डोळे का भरून आले
सावरायला गेलो त्याला तर
झरे फुटल्यासारखे वाहू लागले,

दुःख माझे होते ,
न कळणारे कुणाला ,
समजणारे होते मला. 
न समजणारे कुणाला ,

दुःख माझे मनात ठेवून
मी मात्र हसत राहिलो
ज्यांच्यासाठी हसलेलो
त्यांच्या पासूनच दूर गेलेलो ,

आज चालताना रस्त्यातून
प्रेमाने माझा हात सोडला
अमानुष झालेल्या रस्त्यांना
आणखी एक प्रवासी मिळाला ,

दुःख आपले डोळ्यात ठेवून
थोडा तो अबोल झाला ,
जाणेल कोणीतरी मन माझे
या आशेने बघू लागला ,

दिशाहीन झालेला प्राणी
शोधत होता दिशा
प्रत्येक दिवशी त्रास द्यायची
काळीभोर निशा 

कोणीच काही बोललं नाहो
स्वताच सावल्यांशी बोलू लागला ,
आठवून क्षण जीवनातले
डोके स्वतःचे आपटू लागला ,

सहन होत नाही तिरस्कार डोळ्यांचा ,
नाही सहन होत मारा अश्लील ओठांचा .
कोणीतरी द्या मला मार काठीचा .
मारून टाकेल भाव अबोल शब्दांचा ,

नव्हती ती सावली आता
स्वतःचीही गेली सोडून आता ,
मिळेल का ते जीवन परत
विचारात पडली यम देवता

पश्चातापाचे तीर हृदयात घुसले,
आपटून डोकेही रक्तबंबाळ झाले ,
स्त्रावाबरोबर रक्ताच्या
भावनांचा त्याच्या चुरा झाला ,
न बोलता एक जीव या जगाच्या आड गेला .......

No comments:

Post a Comment