Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

मुक्त पक्षी

                      
कविता जणू माझ्यात,हिमोग्लोबिन बरोबर पळते ,
अभ्यास करताना डोक्यात येते,तेव्हा माझ्याकडून बोलून घेते,
नाराज होऊ नये ती,म्हणून हातात माझ्या लेखणी येते,
असच काहीतरी सुचत आणि सगळ्यांना ती कविता वाटते,

स्वप्न बघायची सोडू नका ,मनाचा कशाला हिरमोड करताय ,
अवघ्या साठ सत्तरच्या वयाला तुम्हीच,शंभर वर्षाचा म्हातारा करताय ,
म्हणून सांगतो कविता करा ,करता येत नसेल वाचा तुम्ही,
मला तर वाटत सगळं सोडा, कविता म्हणूनच जगा तुम्ही,

मग आयुष्याकडे तुम्ही आयुष्य म्हणून बघणार नाही ,
कारण कवितांपेक्षा जास्त, आयुष्य महत्वाचं वाटणार नाही ,
तीच लय येईल तिची यमक साधण्याची,
दुःखाची चारोळी बनवून खेडवळ कविता घडवण्याची,

मग डोळे बंद करून खिडकी बाहेरचा एक थेंब धरा,
आभाळ दाटेल मनात तुमच्या त्यात मुक्त पक्षासारखे फिरा

No comments:

Post a Comment