Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

माझं आभाळ


बाहेर आभळाकडॆ बघताना
मला माझं आभाळं आवलं
शंका आली मनात कारण
त्याचं थोडंस वय झालेलं


आता माझा श्वास सुध्दा
आभाळाचीच देणगी होती
उरामधला विश्वास आणि
मनामधली जिद्द होती

आभाळही फार वेळा भिजलं
कधी सुखात,कधी दुखात निजलं
मला सुखं देउन,
स्वतः मात्र विरत गेलं



य़शात माझ्य़ा ते होतंच
अपयशातही जे सोबत राहिलं
तुटलेल्या मनाला माझ्य़ा
मायेने फुलवत राहिलं

बंधनं होती त्याची
पण मला ती आवडाय़ाची
आभाळ जवळ आलं कि
त्यांचाच आहे मी अशी ग्वाही द्यायची

आभाळं गप्प बसायचं तेव्हा
मला मात्र सुतीक व्हायचं
फास लागल्याप्रमाणॆ जणू
माझं तर आयुष्यच संपायचं

प्रेमाचे धडॆ मीही घेतले
तसं कधी वागलो नाही
आभाळ माझ्य़ामुळॆ लाजेल
म्हणून मर्यादेबाहेर गेलो नाही

शेवटी सगळं नश्वर आहे
आभाळही कधी कोसळॆलं
भक्कम करुन पाय माझॆ
एकटाच मला सोडॆल

मग खोटी नाती जोडा
प्रेमासाठी वणवण फिरा
मन तोडून तोडून स्वतःचे
आभाळाकडॆच परत या

नसेल तेव्हा ते काय होईल
बोचंत बसशील अस्तित्वाला
जुमानलं नाही आभाळ म्हणून
टॊचत बसशील स्वतःला


माझं आभाळं छॊटसंच
जणू माझं पुर्ण आयुष्य
मी त्याला जपतोय
तु तरी कशाला सोडतोय



जवळ कर............ 
काळजी घे.......... 
ते एकदाच मिळतं........आणि
..............अचानक कोसळतं 


No comments:

Post a Comment