Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

पाऊस आणि तू




पावसाचा थेंब तुला छेडतो,
तेव्हा रोम रोम जागत असेल ना,
सांग राणी मनात तुझ्या ,
गुदगुल्यासुद्धा होत असतील ना,



मला तुझा चेहरा दिसतो,
थेंबानी पावसाच्या भरलेला,
तरीसुद्धा मनाला माझ्या,
मी स्वताहून आवरलेला,



असं वाटतं तुझ्याबरोबर,
तुझ्या इतकच खूष राहावं,
मनात माझ्या आनंद एवढा,
कि पावसाला वाटतं माझ्यामधेच भिजावं

No comments:

Post a Comment