Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

मला वाटतं

मला वाटत आकाशात;सुंदर एखाद घर असाव,
सोन्या चांदीची गरज नाही.चंद्र तारयांचे कुंपण असाव,
वेली असाव्यात तीथेदेखील,फुलांच्या जागी प्रेम असाव,
मला वाटतं आकाशात ,सुंदर एखाद घर असावं,

रोज रोज पाऊस तिथे पडावा,मीही रोज त्यात भिजावं,
थंडून जेव्हा घरी यावं,तेव्हा सूर्याने मला मिठीत घ्यावं,
चंद्राने रोज गोष्टी सांगाव्यात,तारयांनी स्वताच स्वप्नात यावं,
मला वाटत आकाशात सुंदर एखाद घर असावं .........

पावसाने आपलं कारंज करावं,सागराने स्वताच तळ करावं,
वेडीवाकडे वळणे घेऊनसुद्धा, नदीने तिथेच खेळायला यावं,
झाडं असावीत तिथेदेखील,मुळांना रागाचं वंगण नसावं,
बहरताना झाडं एखाद,स्वर्गाने स्वतःवून त्यातच फुलाव ,
मला वाटत आकाशात सुंदर एखाद घर असावं ...

No comments:

Post a Comment