Protected by Copyscape Online Plagiarism Software

Friday, December 3, 2010

तुजसवे.....................




नजरेतील भाव तुझे
मनाची ओळख सांगतात
सांगायचे असते खूप काही
पण वेडे बोलतच नाही

वाऱ्यासवे रुळणारे
रेशमी केस तुझे
त्याच्याबरोबर मंजुळ गाणी गातात
गालावर तुझ्या रमण्याची
त्यांची वाईट खोडी
माझा जणू जीवच घेऊन जातात

मनमोहक हास्य तुझे
कोमल प्रभा पसरवतात
गालावरील खळी तुझी
काळजाचे ठोके चुकवितात

सुगंध तुझ्या शरीराचा 
मनामध्ये दरवळत राहतो
स्पर्श नितळ कांतीचा
नवचैतन्य बहरवितो

माझ्यावरती रागे भरणे
असह्य वेदना देते
लडिवाळपणे बोलणे तुझे
सारा शीण घालविते

अदा तुझ्या प्रेमाची
रोमारोमात वसते
मिठी तुझ्या सहवासाची
बेधुंद मज करते

तुजसवे प्रीत माझी
अधिकच बहरली
आयुष्य जगण्याची मला  
नवी उमेद गवसली
                     -    संकेत गुजर               


Tuesday, November 16, 2010

दिवाणी............


रात्र कुरकुरली  फारच,
कुठेतरी प्रियेचे मन सुद्धा ,
येणार आहे आज राजा राणीचा ,
पेलत नाही मज भार सुखाचा ,

राजाला माझ्या काय देऊ ,
किती नटु अन् किती थटु,
जेवणात वेळ फुकट घालवू कि,
गुलाबी  स्वप्ने  रंगवत बसू,

आजही ती मखमली रात्र आठवते ,
लाजवून मला माझ्यातच भिजवते,
आवेगातील त्याची ती मस्ती वेगळी ,
फुलराणी ही नेहमी त्यातच  हरवते,

भांडणं किती एकत्र असताना,
मिटायची लगेच ओठ भिजताना,
सगळचं कसं आठवतंय आज  ,
लाजती दात अन् छेडती ओठांना,

खिडकीतून हवेचा झोत वेडा ,
छेडतो रे या सखीला तुझ्या,
तू असायचास तेव्हा तू नी मी,
फुललेली दोघांची ती रात्र प्रेमवेडी,

मनात प्रेमाचा सागर उसळतो,
तू ये ना घरी प्रिया लवकर,
या घाईत मी वेडी होईन रे ,
तृप्त कर मला तू क्षण भर,

वेडी तुझी दिवाणी मी,
तुझ्यासाठीच  आजूनही फुललेली,
कुस्करून दरवळायची घाई किती  तिची ,
      हीच शेवटची इच्छा या वेड्या फुलाची,       
       

Monday, November 15, 2010

शिवरं...........


बाहेर शिवरणारा पाऊस,
चादरीत त्या थंडी लपलेली,
सुंदर आठवण मनात माझ्या ,
प्रेमासाठी मी जपलेली ,

काय ही तळमळ खुळी,
कुडकुडणार्‍या थंडीची ,
हुरहूर असावी मनामध्येच ,
जशी मनातल्याच आठवणींची ,

वाट बघतंय मन माझं ,
त्या वेडावलेल्या थेंबाचं,
डोळे बंद करून शोधायचो ,
गुपित मी माझ्यांच मनाचं,

घाई लागलीय मनाला ,
किनाऱ्याला गाठायची ,
होडी प्रेमाच्या शिडाची,
प्रेमविहंगातच  वाहायची ,

गडगडणारा आवाज झाला,
कोण  ? हा नवा पाहुणा आला,
काळोखी रात्रीत मुसळधार पावसात ,
हृदयाचा ठोका जरासा चुकला ,

वेडी कुठची कोण होती ,
छत्रीत सुद्धा भिजलेली,
थेंबापासून वाचवत इज्जतीला,
पावसाचीच उनाड ती सर आलेली,

आठवणींची आठवण बनून ,
मज ती बिलगलेली ,
प्रेम करते तुझ्यावर ,
असेच  वेडी म्हणून गेली,

काळोखात जी एकटीच ,
रात्रीसकट घट्ट होत गेली ,
मिठीत आली मनाच्या ,
अन् प्रेमातंच विरघळली .....
वेडी कुठली कोण होती ,,,सोडून गेली खरी... पण आठवणींचा श्वास बनून राहिली.

Monday, November 1, 2010

दुर्लक्षित

शोधू कुठे स्वत:ला ,तूच ओळखत नाहीस तर ,
नाव ,गाव ,पत्ता ,काय सांगू ,दुर्लक्षित जर मी आहे तर,

नाकावर घेशी रुमाल,बघताच क्षणी मला ,
नजरे बरोबर पाठही फिरवतोस ,का असे तू वागला?,

अरे हाडामासाचीच आहे, जात तुझी माझी ,
न भेदिला देवाने ,मग तू का भेदिला मला ? ,

वाटे मज बोलावेसे ,न बोलीशी तू तरी ,
असेल काम तर सांग रे, न तू तेही सांगीशी ,

मनी उमटती भाव माझ्या, न वेगळे तुज परी,
अवहेलना का अशी , करिशी दुर्लक्ष मज पाशी ,

तोच मी गर्दीतला ,तू बघितला न बघितला ,
प्रवासी असूनही सोबतीचा ,खिडकीबाहेरच नजरांना टांगलेला ,

जवळ यावेसे वाटे मनी, नजरा तुझ्या हेटाळती ,
किती दुख्ख याचे मनी , नसेलही तुला माहिती ,

न सावळी आवडे तुला, न आवडे नजर माझी ,
भंगलेला संसार माझा ,न सहानुभूती तुज डोळांती ,

असे तुज पाशी सर्व, म्हणायला आयुष्य तरी ,
येत्या क्षणी पोटाचे काय ,न मला काळजी उद्याची ,

पेटवशील तर जळेन मी ,जळे घाम माझा इंधन म्हणून ,
न जाणे शरीरात काय, रक्त वाहे खारट बनून,

मागीशी काय तू देवापाशी ,संसाराचे सुख जणू ,
असा जन्म नको कुणा ,मी रोजच करतो देवा म्हणू ,

दुखतं ,खुपतं,मलाही,वाहे झुळझुळा डोळ्यातून ,
नाजूक मनाचा मानकरी ,कसा निसटला तू जाणीवेतून ,

मदत नको करूस तू ,होत नसेल तुझ्याने तर ,
तीळ तीळ मारे हेटाळणी ,जमल्यास तू ते बंद कर ,

भिकारी नाही मी, थोडासा गरीबच आहे ,
वेडा नाही मी, जो मनी तुझ्या राग आहे ,

ज्यात काही स्वार्थ नाही ,असे माझे जग आहे ,
प्रेमझरा वाहे निरंतर , माणुसकी तरी त्यात आहे ,

झालोय जणू दुर्लक्षित ,तुमच्यापैकी एक मीही ,
मिठीत मला घेऊ नका ,नको तिरस्काराची जाणीवही.................


Saturday, October 30, 2010

माजो चिखल ,,,,

या चिखलाच्या पेरणीत,कसो मिया लडबडीत,
जसा माझा जीवन सुध्धा,या तरयाच्या येका ओळीत,
कितके हे प्रयत्न,जसा जळता माझा काळीज,
जन्मभर कष्ट करून सुध्धा,मिया दुख्खांच्या ओंजळीत,

भित्रो नाय आसय मिया ,मरणाची भीती नाय माका,
झिला चेडवाचो भयं दिसता,बायलेचा काळीज माझ्यात धडाकता,
माझ्या काळजाक मिया कधीच चीरडलय,
जसो काळजाचो माझ्या चवाटो केलय,
पण माझ्या पोरांचा काय? इचार करताना,
रोज रोज मिया वायचसो मेलय,

पावसात तरयो लायताना ,दुख्खाचो बान फोडतय मिया,
माझ्याच प्रत्येक थेम्बांका ,चिखलात हरावताना बघतय मिया,
दोन रुपयाची नोट आजुनसुध्धा माझ्याकडे गावात,
गावलेली आटणी पोराची जाता त्याच्या बुडकुल्यात रवाक ,
आजयेच्या घोटयेत दोन फुटके सुपारे गावतीत,
बायलेच्या पदरात गरीबाची लंका गावात,

अर्दो कप कोरी चाय,धड ती भाकरी सुध्धा भिजना नाय,
खोटा सुख बघून बायले पोराचा ,काळीज फाटल्याशिवाय रवना नाय ,
चेडू माझा कोंकणातला .आवशीचा काळीज कोंकण ,
हाडा झीजयलेन म्हातारेन हिसर,माझ्या तर तनामनात ता पण,

शरीर आसा निरोगी माजा,रोज काम करून करून,
आयुष्याच्या पदाराक गाठी किती, ठिगळाका गुटाळून गुटाळून ,
माका फक्त वाव होयो,सहानभूती नको कोणाची,
पिसात माझ्या बळ आसा,कमी आसा फक्त मोकळ्या आकाशाची

Friday, October 29, 2010

चेडवाचो समुद्र

 
किनाऱ्यार बसल्यार तो, खुळ्यासारखो करता ,
अगो चेडवा समुद्र तुझ्यामाझ्यात रोजचोच उसाळता,
रेतयेत तिया पाय ठेयतय,ठशाक मात्र तिया थीसरच इसारतय,
अगो तिया गेल्यार मात्र, येड्या सारखो करता,
अगो चेडवा समुद्र तुझ्यामाझ्यात रोजचोच उसाळता.

बघू नको तिया त्याका,लामसून रूपाक भियान,
सांगाचा त्याका ह्याच होता, आयुष्याक जवळकर त्याच्यासारक्या धीरान,
अगो तुझ्या बद्दल इचारून,माकासुद्धा याड लायता,
अगो चेडवा समुद्र तुझ्यामाझ्यात रोजचोच उसाळता.

सांचेच्या येळात कसो,तुझ्या मनाक भुरळ घालता,
आटयतय तिया आयुष्याक,तो मात्र पायाक छेडून जाता,
असो वागता तुझ्या वंगडा ,आणि तुझ्याच डोळ्यात जावन रवता,
अगो चेडवा समुद्र तुझ्यामाझ्यात रोजचोच उसाळता.

पानयात खेळणाऱ्या पोरांका बघून,तुका सुद्धा पोरांची आठवण येत मा,
खोटा माका सांगा नको तिया ,सांग नवऱ्याचा प्रेम सुद्धा तुका आठवता मा ,
अगो असा बघू नको तिया, डोळ्यामागे तुझ्या तो येडो पिसो जाता ,
अगो चेडवा समुद्र तुझ्यामाझ्यात रोजचोच उसाळता.

प्रत्येक लाटेत अगो तो,तरंगाका तुझ्या छेडता ,
पायाखालच्या रेतयेक सरकवून,आपल्याकडे वडता,
इतक्या त्याच्या जवळ जातंय, तुका जरा तरी कळता ,
मिठीत घेवक बघता तुका तो , परतल्यार तिया तो भसा भसा रडता,
किनाऱ्यार बसल्यार तो खुळ्यासारखो करता ,
अगो चेडवा समुद्र तुझ्यामाझ्यात रोजचोच उसाळता