Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

कळी

उडायचे आहे ,
खिदळायचे आहे ,
पक्षी बनून हिंडताना ,
कुमुदिनीच व्हायचे आहे,

कळी आहे मी,
माझ्या मनाची,
आहे भागीदारीण ,
त्या निस्वार्थ सुखाची ,

का मज भुंगा छेडून गेला? ,
रासक्रीडा जो करून गेला ,
रोमारोमानेच माझी वाट लाविली ,
प्रणयाची नकळत मी खीर चाखली ,

ज्वानी माझी जणू बहरलेली ,
कोवळी होती न उमललेली ,
मनात माझ्या काय भाव हा,
प्रेमासाठी मी आसुसलेली ,

काय हे साचलेलं,
न मला हि उमगलेलं,
हा भाव कोणता दुसरा ,
पहिल्याला ज्याने अनोळखीलेलं,

का प्रीतीची ही झर आहे?,
की माझा स्वभाव जणू,
गंध घेतला तो आनंदी ,
त्यातच मी फुलते जणू ,

कळीतच फुलावे हजारवेळा,
फुल होण्यापूर्वी जणू ,
उघडू कसे दार प्रेमाचे ,
राहु दे बंद असे गुपित जणू ,

कसे फुलावे हजारवेळा ,
न बनता फुल जणू ,
आयुष्याला दे आशेची किनार ,
नको निराशेचे दार तू खणू,

पाकळ्यात तुझ्या नाचेल ,
कळीहि तुझ्या मनाची ,
एक पर्व जगून सुद्धा ,
वाट बघेल ती फुलण्याची,

आयुष्य तुझेही परत परत फुलेल ,
भीती नसेल त्याला कोमेजण्याची ,
एक कळी आहे हि माझ्या मनाची ,
गवसेल तुलाही कळी तुझ्या सुखाची ,

"कळी आहे मी माझ्या मनाची ,आहे ती निस्वार्थ सुखाची"

No comments:

Post a Comment