Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

राजाराणीची गोष्ट...

राजा होता एक मनाचा ,
जणू मालकच स्वतंत्र्याचा,
प्रेमाच्या युद्धात बिचारा ,
गुलाम झाला एका तरुणीचा ,

फक्त सुखाचा पाऊस होता ,
स्वप्ने होती त्या उनाड सरीची,
थेंबाथेंबाला  जणू प्रेमच झालेले,
मन राजाचे सखीतच गुंतलेले ,

अनावर ती उसळी प्रेमाची ,
तोडायची होती बंधने जगाची ,
राजाने आज धाडस केले,
वेडीला त्या लग्नासाठी विचारले ,

प्रतिसाद जणू एक वारच झाला ,
हा भाव तिने अनोळखी केला ,
प्रेमाला त्याच्या तिने नाकारले ,
डोळ्यातून त्याच्या रक्ताश्रू वाहिला ,

पाऊस त्याला देई चटके ,
धुक्यात तो घुसमटला ,
स्वप्ने जळताना सरीची ,
मनापासून तोही जळला,

राज्य सांभाळायचे होते त्याला ,
त्यानेच मग स्वतःला सावरला ,
अश्रू डोळ्यात तेवत असताना ,
आगीला तो पिऊन गेलेला ,

नशीबाने त्याला बंधने घातली,
त्याचेही आता लग्न झाले ,
प्रियेची ती जाणीव नव्हती ,
राजाचे आज जगच बदलले ,

प्रणयाची रात्र वेगळी ,
गुलाब काट्यांचे  मिलन होते,
तिच्या सावलीत जगताना ,
प्रेमांकुर फुटत होते ,

राज्याच्या पदरी आज ,
एक कळी(मुलगी) एक वाघ होता,
भूतकाळाचा भाव बिचाऱ्याला,
कधीतरी सतावत होता ,

सखी आज परत आली ,
आजूबाजूला नाचू लागली ,
दुर्लक्ष करताच राजाने ,
प्रश्न ती मांडू लागली ,

कस आठवलं सखे पान तुला मागचं,
चुरगळून टाकलस जे होतं स्वतःचं,
भेग काचेची परत जुळणार नाही ,
आयुष्यात सखी भूतकाळाची खुणा नाही ,

क्षितीज नवं सापडलाय मला ,
राणीच्या प्रेमानेच जगवलंय मला ,
तनामनात नाही श्वासात आहे ती ,
शिवाय तिच्या मी काहीच नाही ,

(राजा)
खेळावेसे वाटले तर मनाशी खेळू नको,
परत सखे कोणाचे मन तोडू नकोस,
चालवत नसेल दोन पावले प्रेमाची तर ,
पायात दुसऱ्याच्या खोट्या बेड्या घालू नकोस ,

कोण होणार होती राणी ,
कोण हे होऊन बसले ,
राजा राणीचा संसार बघून ,
प्रेम स्वतःहून त्यात फसले
आणि राजा राणी दोघेही हसले  



तुझी वाट पाहताना


पानाफुलांसारख्या आठवणी तुझ्या ,
मनी भाव अबोल झाला ,
येशील का राणी तू ,
या कातर वेळी भेटायला ,

अस्ताच्या किरणांत संपतो दिवस ,
चंद्राचे टिमटिमणे बनून ये ,
हरिणीच्या डोळ्यात तुझ्या ,
प्रेमाचे गाणे घेऊन ये ,

यायला जमले नाही तर,
आठवण बनून ये ,
स्वप्न समजून राणी मला ,
फक्त तुझ्या मिठीत घे ,

वेडा आहे मी आयुष्याला ,
जराशी वेडी हो तू
फुलताना राणी फुलासारखी ,
मला सुद्धा फुलव तू ,

मी तर करतोच प्रेम तुझ्यावर ,
तू सुद्धा थोड करून बघ ,
माझ्यासारखच  राणी तू सुद्धा,
प्रेमालाच डोळ्यात घेऊन जग ........

मग बघ सगळ्यातच ,
तुला मी दिसेन ,
जवळ नसलो तुझ्या तरी ,
तुझ्याच  डोळ्यातून  हसेन ,

प्रत्येक जन्मी ,
मी तुझ्याच प्रेमात फसेन ,
कितीही वेळ लावलास तरी,
मी वाट बघत बसेन..........

पण मी नेहमी तुझ्या साठीच असेन,
नेहमीच असेन....... तिथेच जिथे तू असशील .

ती सुद्धा जगतेय (भाग १)


                                                     
नसून असल्यासारखे सगळेच ,आयुष्य ,प्रेम,नशीब,भाव ,
माझ्या मनातला एखादा ,जणू शरीराचा लावलेला(भाव) ,

घर जणू नाहीच, खिडकीची फुटकी काच,
बंद पडलेले घड्याळ ,तारखा सणाशिवाय जगलेले दिवस ,

शोधायचे काय अन कशात ,माझ्यात मलाच की ,
मी”(स्वतःमध्ये) त आयुष्याला,काहीच माहित नाही,

जाणीव जणू नाहीच ,ओरबाडून नेलेली ,
झाली तर होते ओलावलेल्या जखमांची ,

तुटतो जीव सारा,नसावा जणू जिवंत ,
विरघळलेले आयुष्य ,न होई प्रवास संथ ,

ओरखडे त्या खिडकीचे ,उमटले काळजावरी ,
शोधले तेव्हा काळीज,न सापडले कुठेही ,

न दुखांचे भान मला ,वाटच माझी काट्यांची ,
असह्य वेदना शीलाच्या(चरित्र), तरीही मी चालायची ,

दुर्मिळ क्षण जीवनातला ,आयुष्यी माझ्या रोजच आला ,
न होता त्यात भाव सुखाचा,पडला नशिबी वासनेचा ,

मखमली रात्र नाही पदरी ,न तो सोन्याचा दिवस माझ्या ,
उन्हातच चंद्राचे टिमटिमणे,अन डोळां नदी आसवाच्या,

नको मला भीक प्रेमाची ,मी आहे समर्थ माझ्या मनाची ,
खोटा भाव का समदुःखाचा,कशा मस्करी उगा मज भावनांची ,

समाजात मी दगड जणू,अश्लील चिखलात बरबटलेला ,
काळोखी रात्रीच्या जळण्यात,मिठीत माझ्या तोच(समाज) विझलेला,

क्षणभराची भूक भागवणारी ,एकटीच मी खुळी नव्हती,
आशा स्वप्नांच्या आयुष्यात, अस्तित्वाची खळगीसुद्धा डिवचत होती,

सुख दुःखाच्या पलीकडले,आयुष्य मी निवडलेले ,
डोळयात पाणी कधीच सुकले ,दुःखाचे झरे मनातच फुटलेले ,

उमळतात उमळतात ,भरभरून उमळतात ,
हृदयावाटे डोळां मार्ग ते शोधतात ,
मी मात्र ते गळ्यातच गिळते ,
अन नव्या रात्रीची मी राणी होते

कळी

उडायचे आहे ,
खिदळायचे आहे ,
पक्षी बनून हिंडताना ,
कुमुदिनीच व्हायचे आहे,

कळी आहे मी,
माझ्या मनाची,
आहे भागीदारीण ,
त्या निस्वार्थ सुखाची ,

का मज भुंगा छेडून गेला? ,
रासक्रीडा जो करून गेला ,
रोमारोमानेच माझी वाट लाविली ,
प्रणयाची नकळत मी खीर चाखली ,

ज्वानी माझी जणू बहरलेली ,
कोवळी होती न उमललेली ,
मनात माझ्या काय भाव हा,
प्रेमासाठी मी आसुसलेली ,

काय हे साचलेलं,
न मला हि उमगलेलं,
हा भाव कोणता दुसरा ,
पहिल्याला ज्याने अनोळखीलेलं,

का प्रीतीची ही झर आहे?,
की माझा स्वभाव जणू,
गंध घेतला तो आनंदी ,
त्यातच मी फुलते जणू ,

कळीतच फुलावे हजारवेळा,
फुल होण्यापूर्वी जणू ,
उघडू कसे दार प्रेमाचे ,
राहु दे बंद असे गुपित जणू ,

कसे फुलावे हजारवेळा ,
न बनता फुल जणू ,
आयुष्याला दे आशेची किनार ,
नको निराशेचे दार तू खणू,

पाकळ्यात तुझ्या नाचेल ,
कळीहि तुझ्या मनाची ,
एक पर्व जगून सुद्धा ,
वाट बघेल ती फुलण्याची,

आयुष्य तुझेही परत परत फुलेल ,
भीती नसेल त्याला कोमेजण्याची ,
एक कळी आहे हि माझ्या मनाची ,
गवसेल तुलाही कळी तुझ्या सुखाची ,

"कळी आहे मी माझ्या मनाची ,आहे ती निस्वार्थ सुखाची"

मला माहित नाही असं का होत...


कधी कधी असं का होतं कि,
सर्वच गोष्टी स्पष्ट कराव्या लागतात,
पण काही गोष्टी अशा असतात,
कि ज्या स्पष्टच करता येत नाही.

कधी कधी असं का होतं कि,
प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यावं लागतं,
पण काही प्रश्न असे असतात ,
कि ज्याची उत्तरे मला सापडतच नाही ,

कधी कधी असं का होतं कि,
दुसऱ्याच्या मनाचा विचार करावा लागतो,
त्याने तसे नाही केले तर मात्र राग येतो .

कधी कधी असं का होतं कि,
दुसऱ्यात गुंतण्याची ओढ लागते ,
भावनांचा माझ्या चुरा होईल,
याची भीती सदैव वाटत राहते

कधी कधी असं का होतं कि,
संस्कार नेहमी लक्षात ठेवावे लागतात ,
जरा जरी विसरलो तर,
मात्र दुख्ख देवून जातात,

कधी कधी असं का होतं कि,
एखाद्याची आपण फार काळजी घेतो,
पण त्यातच कुठेतरी,
त्याला अतिशय दुखावून बसतो,

कधी कधी असं का होतं कि,
पावसात(प्रेम) भरपूर भिजावसं वाटतं,
सर्दी(विरह) झाल्यावर मात्र,
त्याच पावसाचा राग येतो,

कधी कधी असं का होतं कि,
मनाविरुध्ध आपण जगत असतो,
दबावाखाली किंवा प्रेमाखातर त्याच्या,
एक ओझं वाहत असतो,

कधी कधी असं का होतं कि,
वाईट माणूस नेहमी चांगलाच वाटतो ,
जवळ आलेलं चांगल्या माणसाला,
न जुमानता आपण सोडून जातो ,

कधी कधी असं का होतं कि,
मन कुणाला दाखवता येत नाही,
माझ्याकडेही आहे नाजुकस मन,
याची जाणीव करवता येत नाही,

कधी कधी असं का होतं कि,
खांद्यावर ठेवलेला प्रेमाचा हात,
ओझं वाटायला लागतो ,
पण त्याच हाताने आधार दिला,
हे मात्र आपण विसरतो,

कधी कधी असं का होतं कि,
रक्ताच्या नात्यापेक्षा दुसरी नाती,
अधिकच प्रिय वाटतात,
रक्ताच्या नात्याला विसरून माणसे,
आपल्याच मार्गाने पुढे चालत राहतात,

कधी कधी असं का होतं कि,
संस्कृती आणि आनंद यापैकी ,
एकाला निवडावे लागते,
एक जरी निवडले तरी,
दुसरे मात्र रुसून बसते

कधी कधी असं का होतं कि,
यश मिळण्यासाठी ,
वेळ आणि नशीब जमावं लागतं,
यांचे दोघांचे जमले,
तरी आपल्याला काहीच जमत नसतं

कधी कधी असं का होतं कि,
एखाद्याला समजून घेण्यासाठी ,
आपण स्वतहून कमीपणा घेतो,
पण तो मात्र फायदा घेवून,
आपलंच अधिपत्य माझ्यावर गाजवतो,

कधी कधी जीवनाची बंधने,
आनंदाला माझ्या मर्यादा घालतात,
मर्यादेबाहेर गेलो तर,
समोर माझ्या प्रश्न उभा करतात,
ज्याच्यावर आपण प्रेम करतो,
तो मात्र दुसऱ्यावर करत असतो ,
त्याच्या बरोबर खुश राहून,
नकळत मला दुःख देतो,

काही वेळा असं का होतं की,
आपण स्वार्थी होतो ,
दुसऱ्याच्या आनंदापेक्षा ,
आपण स्वताचा आनंद जास्त मानतो,

"मला माहित नाही असं का होत असतं
 पण प्रत्येकाबरोबर प्रत्येकवेळी हे असंच होत असतं
 न जाणे का होत असतं "