Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

राजाराणीची गोष्ट...

राजा होता एक मनाचा ,
जणू मालकच स्वतंत्र्याचा,
प्रेमाच्या युद्धात बिचारा ,
गुलाम झाला एका तरुणीचा ,

फक्त सुखाचा पाऊस होता ,
स्वप्ने होती त्या उनाड सरीची,
थेंबाथेंबाला  जणू प्रेमच झालेले,
मन राजाचे सखीतच गुंतलेले ,

अनावर ती उसळी प्रेमाची ,
तोडायची होती बंधने जगाची ,
राजाने आज धाडस केले,
वेडीला त्या लग्नासाठी विचारले ,

प्रतिसाद जणू एक वारच झाला ,
हा भाव तिने अनोळखी केला ,
प्रेमाला त्याच्या तिने नाकारले ,
डोळ्यातून त्याच्या रक्ताश्रू वाहिला ,

पाऊस त्याला देई चटके ,
धुक्यात तो घुसमटला ,
स्वप्ने जळताना सरीची ,
मनापासून तोही जळला,

राज्य सांभाळायचे होते त्याला ,
त्यानेच मग स्वतःला सावरला ,
अश्रू डोळ्यात तेवत असताना ,
आगीला तो पिऊन गेलेला ,

नशीबाने त्याला बंधने घातली,
त्याचेही आता लग्न झाले ,
प्रियेची ती जाणीव नव्हती ,
राजाचे आज जगच बदलले ,

प्रणयाची रात्र वेगळी ,
गुलाब काट्यांचे  मिलन होते,
तिच्या सावलीत जगताना ,
प्रेमांकुर फुटत होते ,

राज्याच्या पदरी आज ,
एक कळी(मुलगी) एक वाघ होता,
भूतकाळाचा भाव बिचाऱ्याला,
कधीतरी सतावत होता ,

सखी आज परत आली ,
आजूबाजूला नाचू लागली ,
दुर्लक्ष करताच राजाने ,
प्रश्न ती मांडू लागली ,

कस आठवलं सखे पान तुला मागचं,
चुरगळून टाकलस जे होतं स्वतःचं,
भेग काचेची परत जुळणार नाही ,
आयुष्यात सखी भूतकाळाची खुणा नाही ,

क्षितीज नवं सापडलाय मला ,
राणीच्या प्रेमानेच जगवलंय मला ,
तनामनात नाही श्वासात आहे ती ,
शिवाय तिच्या मी काहीच नाही ,

(राजा)
खेळावेसे वाटले तर मनाशी खेळू नको,
परत सखे कोणाचे मन तोडू नकोस,
चालवत नसेल दोन पावले प्रेमाची तर ,
पायात दुसऱ्याच्या खोट्या बेड्या घालू नकोस ,

कोण होणार होती राणी ,
कोण हे होऊन बसले ,
राजा राणीचा संसार बघून ,
प्रेम स्वतःहून त्यात फसले
आणि राजा राणी दोघेही हसले  



No comments:

Post a Comment