Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

तिची आठवण

तिची स्वप्ने ,
माझ्या आठवणी,
तिचे मन, माझे जीवन ,
तिचे हसणं माझे सुख ,
तिचे सुख माझा स्वर्ग ,
तिचे रडणं माझे दुःख ,
तिचे दुःख माझी दशा ,
तिच्या डोळ्यात माझं हरवणं ,
तिचे हरवणं माझं शोधणं,
तिच्या केसात माझं गुंतणं,
जाणून बुजून त्यांना विस्कटवणं,
आवडतं मला मग तिचे रागे भरणं,
मग तिचे रुसणं आणि माझं मनवणं,
येत नसेल आठवण तरी तिला आठवणं ,
त्यातच हरवून स्वतःच स्वतःशी हसणं ,
ओठांनी न बोलता उगाच तिचे इशारे करणं,
माझ्या तरंगात वादळ निर्माण करणं ,
तिचे डोळे आठवले की शब्दच संपतात ,
माझ्या तनामनाला चिंब चिंब भिजवतात ,
रोम रोम रोमांचित करतात माझा ,
तिच्या मनाची हिरवळ माझ्या मनावर पांघरतात ,
तिच्या प्रेमापेक्षा मला तिचे रुसणं आवडायचं
त्यात तिचे सौंदर्य अजूनच खुलायच ,
मग जे अनुभवायचं ते स्वर्गापेक्षा वेगळ कधीच नसायचं,
प्रेम प्रेम प्रेम काय माहित जणू हेच असावं ,
तिच्या माझ्या सुखदुःखात दोघांनी एकत्र भिजावं

No comments:

Post a Comment