Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

रंग माझ्या मनीचे

असा कसा तू वेडा पिसा रंग ,
परतीच्या(मृत्यूच्या)क्षणांना करिशी भंग,
भुरळ घालुनी मनी माझ्या,
भिजविशी सर्वांचे जणू अंतरंग,

उसळतोस तू आभाळ फाटूनी,
रंग माझ्या मनीचे येती हुरहूरुनी,
आठवणी जुन्या राहिल्या नवीन बनुनी ,
रात्र प्रेमाची जणू गेली अंग भिजवूनी ,

घना तू तनामनात फिरशी ,
जोडूनी देशी नात सुखाशी ,
आठवणीत माझ्या तूच येशी ,
भावना जुळावी जणू माझी तुझ्या भावनेशी ,

काळीज माझ्या डोळ्यात येतं ,
थेंबासाठी आसुसलेलं ,
दुःखांना झेलून झेलून ,
जणू करपूनी गेलेलं,

तुझे थेंब जणू ,
माझ्या काळजात गोठतात,
बरसावे उतावळ्यासारखे
असे या अधाशाला सांगतात ,

सगळ्याच थेंबाला माझ्या,
एकदम प्यायचा प्रयत्न करशील
तेव्हाच माझ्या राजा ,
तू सुखाचा बार उधळशील

प्रत्येक थेबं जणू विचारवंतच होता
मैफिलीत त्याच्या मला कवटाळून होता ,
दुःखांना सुख समजून मी मिठी मारली,
न राहिले ते दुःख आता न राहिली ती बेचैनी,

काय रे घना तू असा.
माझ्या मनातला प्रियकर जसा
मला फक्त प्रेम करता येत
आणि तुला ते उधळता येत

No comments:

Post a Comment