Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

सेकंड क्लासचा डब्बा

सेकंड क्लासच्या डब्यातलं,
जग किती वेगळ असतं,
खिडकीबाहेर छॆडूनसुध्दा,
खिडकीतच सीमित असतं,

रोज मला जे दिसतं,
ते मला बघवत नाही,
एका जागेवर बसुन बसुन ,
मन मात्र जळत राहतं,

दुसरया लोकलच्या सुंदर(LADIES) डब्याला,
कसे नुसते डिवचत असतात,
आपल्या माणसाबरोबर(WIFE) झोपुन रात्री,
सकाळी सकाळीच पिसाळतात,

डब्यात एक समुह,
ती मात्र एकटीच,
बोचतात नजरेने असे,
जशी सोडली असावी फुकटी,

नजरेतल्या लाचारीला जे,
लाज तिची समजुन बसतात,
नजरेशी नजर तिच्या भिडताच,
यातना तिच्या काळजाला चिरतात,

या समुहात राहणारा,
"सकाळ"(old fashion)ही वाचत होता,(i m talking about news paper)
असेल बिचारा कमी शिकलेला,
"मिड डॆ”(modern)वाचणाराही त्यातच होता,

माज्या माणसांच(Marathi ppl) काय सांगु,
त्याचि तर मला कीव येते,
बलात्कारातील एखादी मुलगी,
त्याची होती जेव्हा कळते,

जेव्हा भांडण होतात डब्यात,
त्यात हे आई-बहीणीवर बोलतात(bad things),
"शिवाजी(the worrier)"माझ्यातला रागवत नाही,
कारण मावळ्य़ाचेच(Marathi ppl) हे शब्द असतात,

चालताना रसत्यातुन मुलगी,
नजर वर करत नाही,
वाइट वाटतं बिचारीचं,
ओढणी सुध्दा लपवू शकत नाही,

वेळ झाला यायला तिला,
की बाप अर्धा मरतो,
विश्वास असतो मुलीवर पण,
तो मुंबईला घाबरतो,

जाऊ शकतो तो मुंबई सोडून,
पण पोट तरी भरणार कसं,
लग्नानंतरच्या या रोपांना,
उभ तरी करणार कसं,

बापाला हेच सांगायचं असतं,
मुली सुरक्षित आहेस तु या छताखाली,
चुकीच्या मार्गावर जाऊ नकोस,
सोडून तुझी हक्काची साउली 

No comments:

Post a Comment