Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

ती सुद्धा जगतेय (भाग १)


                                                     
नसून असल्यासारखे सगळेच ,आयुष्य ,प्रेम,नशीब,भाव ,
माझ्या मनातला एखादा ,जणू शरीराचा लावलेला(भाव) ,

घर जणू नाहीच, खिडकीची फुटकी काच,
बंद पडलेले घड्याळ ,तारखा सणाशिवाय जगलेले दिवस ,

शोधायचे काय अन कशात ,माझ्यात मलाच की ,
मी”(स्वतःमध्ये) त आयुष्याला,काहीच माहित नाही,

जाणीव जणू नाहीच ,ओरबाडून नेलेली ,
झाली तर होते ओलावलेल्या जखमांची ,

तुटतो जीव सारा,नसावा जणू जिवंत ,
विरघळलेले आयुष्य ,न होई प्रवास संथ ,

ओरखडे त्या खिडकीचे ,उमटले काळजावरी ,
शोधले तेव्हा काळीज,न सापडले कुठेही ,

न दुखांचे भान मला ,वाटच माझी काट्यांची ,
असह्य वेदना शीलाच्या(चरित्र), तरीही मी चालायची ,

दुर्मिळ क्षण जीवनातला ,आयुष्यी माझ्या रोजच आला ,
न होता त्यात भाव सुखाचा,पडला नशिबी वासनेचा ,

मखमली रात्र नाही पदरी ,न तो सोन्याचा दिवस माझ्या ,
उन्हातच चंद्राचे टिमटिमणे,अन डोळां नदी आसवाच्या,

नको मला भीक प्रेमाची ,मी आहे समर्थ माझ्या मनाची ,
खोटा भाव का समदुःखाचा,कशा मस्करी उगा मज भावनांची ,

समाजात मी दगड जणू,अश्लील चिखलात बरबटलेला ,
काळोखी रात्रीच्या जळण्यात,मिठीत माझ्या तोच(समाज) विझलेला,

क्षणभराची भूक भागवणारी ,एकटीच मी खुळी नव्हती,
आशा स्वप्नांच्या आयुष्यात, अस्तित्वाची खळगीसुद्धा डिवचत होती,

सुख दुःखाच्या पलीकडले,आयुष्य मी निवडलेले ,
डोळयात पाणी कधीच सुकले ,दुःखाचे झरे मनातच फुटलेले ,

उमळतात उमळतात ,भरभरून उमळतात ,
हृदयावाटे डोळां मार्ग ते शोधतात ,
मी मात्र ते गळ्यातच गिळते ,
अन नव्या रात्रीची मी राणी होते

No comments:

Post a Comment