Protected by Copyscape Online Plagiarism Software

Wednesday, February 23, 2011

एक सकाळ गावाकडची


मन परत वळले, शेंबड्या वाटांवरती,
गाठ सुटली प्रेमाची, गावाकडच्या सुखाची,

न रमे मन या शहरी, न जगण्याची ती खूरखुरी,
ती नाती खोटी शहराची, मी भगली गावठी बरा,

आवड मनाची वेगळी, करडावरच्या दवाची,
रात्र स्वताहून हरवे, धुक्यामध्ये सावरताना,

घाई असते मनात माझ्या, किरणांना झेलायची,
उरामध्ये जी फुलायची, आयुष्याची सकाळ जणू,

रवी येता बाहेर थोडा, पावलांचा वाढे वेग,
मनात अस्पष्ट चित्रे, किनाऱ्यावरच्या झुल्यांची,

पानिणीतून चाले चिखल, शेणासकट गुरांचे ठसे,
मनामध्ये स्वताहून हसे, आठवणींचे कदाचित,

वाढता अंतर पावलांचे, घर नेहमी तुटायचे,
वस्ती हवेत बांधलेली, जाळी त्या कोळीयांची,

चालता चालता किनारा दिसे, मन माझे होई वेडे पिसे,
बघूनी आंघोळ ती शांत, पाण्यावरती धुक्याची,

सापासारखी वळणे, गावाकडच्या वाटांची,
त्या वळणातच हसे, तो सुंदर चेहरा,

नजरेस भिडे नजर, मनी सकाळ सकाळ,
चोरलेल्या नजरांना, मी दाखवत नसे,

दगडावरती किनाऱ्याच्या, वेगळी पालवी पालवी,
सावली माझ्या मनाची, तिच्या डोळ्यांतही दिसे,

नसे ती जवळ कधीही, तरी जवळ जवळ,
नसे जवळ म्हणे मी तेव्हा, ती रागावून बसे,

किनाऱ्यावर फिरताना, उरा-श्वासात निसर्ग,
काळीज फुटून वाहे, मनी सुखाचा झरा,

खळखळ त्या नदीची, गुदगुली मनी मनाची,
मी ही भारावूनी जाई, निसर्गाला तिच्यापरी,

पावसाची मजा काय, माझ्या गावी घर नभांच,
माडाच्या झाडावर हसे, ती पर्जन्य देवता,

मी घेउन फिरतो, झुलं माझ्याचं मनाचं,
नातं थेंबांच थेंबाशी, अन् घरं पावसाचं.          

                                           राजाराम राउळ

Monday, February 21, 2011

मोहिनी


चेहऱ्यावरच्या केसांना तुझ्या,वाऱ्याबरोबर थोडं हलावसं वाटतं ,
डोळ्यातील आनंदाला तुझ्या,माझ्या डोळ्यांना पिऊन टाकावसं वाटतं,
गालावरच्या खळीला तुझ्या,आणखी थोडं खोल व्हावंस वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

हवेला फक्त तुझ्या,शरीराभोवती वाहवसं वाटतं,
एकुलत्या एक सावलीला तुझ्या,वेड्या उन्हामध्ये खेळावसं वाटतं,
    रस्त्यावरच्या प्रत्येक कणालाही,त्याच सावलीचा भाग व्हावसं वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

किनाऱ्यावरती बसली असताना सागराच्या,त्याला तुला मिठीत घ्यावसं वाटतं,
प्रत्येकवेळी वाहत येणाऱ्या लाटांना,तुझ्यासारखाच किनारा मिळावा असं वाटतं ,
नावाडी आज वेडा माझ्यासारखा तुझा,त्याला लवकरात लवकर किनाऱ्यावर यावसं वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

तेजाने तुझ्या खुलली संध्याकाळ,तिलाही क्षणासाठी मोठं व्हावसं वाटतं,
कातरवेळी या माझ्याजवळ तू,मला या क्षणांना रोखून ठेवावसं वाटतं,
इर्षेने जळून चाललाय निसर्ग तुझ्या,त्यालाही तुला लपून बघावसं वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून,तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

चांदण्यांनी खुललेलं आकाश,वाकून आज तुला बघतंय,
आकाश असं का बघतंय म्हणून, धरणीचं पाखरू थोडसं लाजतंय,
वेडावलेले पाखरू हे,मलाही गुलाबी वेड लावतंय,
त्याच पाखराच्या समोर बसून मला फक्त त्यालाच बघत बसावसं वाटतं

Sunday, February 20, 2011

किनारा


किनाऱ्यावरून चालताना
क्षणभर वळून पाहिले
आठवणींचे काही क्षण
पाउलखुणांत राहिलेले

प्रत्येक पाउलखुणांसरशी
एक आठवण होती
आठवणींना त्या वाळूची
क्षणभर सोबत होती

कातरवेळी तो किनारा
माझी नेहमी वाट पाहतो
वाळूच्या ओलाव्याने
मनास माझ्या स्पर्श करतो

भाव माझ्या मनातील
त्याला जणू उमगतो
लाटेसवे येउनी मग
सांत्वन माझे करतो
              -    संकेत

Sunday, February 13, 2011

तू आणि मी


तू आणि मी
फक्त चालत राहतो
गप्प बसूनही
हातांनी बोलत राहतो

सतत नजर चुकवून
आपण एकमेकांना पाहतो
लोक बघतील म्हणून
थोडं दूरच राहतो

नजरेला नजर भिडता
डोळे बोलू लागतात
तुझ्यामाझ्या मनातलं
सारं गुपित सांगतात

अवघडलेलं सगळं
सोपं वाटू लागतं
वेडावलेलं मनही मग
शहाण्यासारखं वागतं

चालता चालता
तो क्षण येतो
माझा हात सोडवून
तुला दूर नेतो

जायचे नसते दोघांनाही
तरीही चालत राहतो
अन् जातानाही सतत
मागे वळून पाहतो
        -          निमिष