Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

रात्रीचही एक जग असतं

कुठेतरी ओठावरची फुले वेचली जात होती,
कुणाची तरी आजही रात्र जळत होती,
आजही कुठेतरी श्रुंगार उतरत होता,
संसारही एक उध्वस्त होत होता,
जळता जळता रात्रही,आज विचारात पडली,
विचारु लागली सर्वानी माझीच निवड का केली..

रात्री डॊळॆ माझे उघडॆ,पापण्य़ा त्या झाकलेल्या,
कळू नये मनातलं म्हणून स्वताहुन मिटलेल्या,
विचार करुन मनाबरोबर अस्वस्थता होती,
अंथरुणावरची प्रतेक घडी जणू हेच सांगत होती,
अंधाराशी झुंजत असताना रात्र मात्र घाबरली,
एकेदिवशी झोपी जाताना रात्र असंच काहीतरी सांगुन गेली,

मोहासकट माया जेथे मद्य पाजत होती,
शरीराच्या आकर्शणाला खुलवुन नाचत होती,
सौंदर्याला भुकेलेले आजही तेथे हजर होते,
वास्तव सोडून जे म्रुगजळामागे पळत होते,
क्षण जीवनाचे व्यसनात जात होते,
पाहुन हे सर्व जी शरमुन गेली,
एकेदिवशी झोपी जाताना........

झगमगामागे आज जीवन नव्हते,
उघड्य़ा डॊळ्य़ासमोर काळॊखी पाप होते,
क्षण मोलाचा प्रतेक आयुष्याचा,
सांगणारेही आज त्यातंच हजर होते,
सत्य असत्याच्या मिठीत होतं,
पुण्य़ पापाबरोबर बागडंत होतं,
अपमानास्पद मला वागणूक का दिली,
हे विचारत जी जळत गेली,
एके दिवशी झोपी जाताना.......

मी तुमच्या दिवसात नाही,दुपारीत नाही,सांजेतही नाही,
सुर्याच्या त्या किरणांत नाही,निसर्गाच्या त्या नजरेत नाही,
रोजच्या त्या दगदगीत नाही,आणी सुखातही नाही,
नुकसानात तर नाहीच ,फायद्यात तर मुळीच नाही,
असे म्हणून माझ्यावर जी रागावली,
एके दिवशी झोपी जाताना.........

माझे मित्र चंद्र तारे ,त्यात वाहणारे गार वारे,
त्यांच्याशीच खेळायला मी येते,सुंदर स्वप्नांची भागीदारीण होते,
प्रेमाला मी जागवते ,थकव्याला मी आराम देते,
आणी मला मात्र दुनिय हे द्रुश्य दाखवते?
सकाळाच्या पहिल्या किरणाबरोबर जी हरवुन गेली,
एके दिवशी झोपी जाताना........

No comments:

Post a Comment