Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

चटई

कोपऱ्यातली चटई बघितली,
आणि जरा वेगळंच वाटलं,
आयताकृती चटईला त्या,
वर्तुळाकार गुंडाळून ठेवलेलं,

किती वापर तिचा घरात,
जेवताना तर कधी झोपताना,
नंतर मग वाईट वाटते,
तिला शांत कोपऱ्यात बघताना ,

पाहुणे घरी आले कि,
पाण्याआधी चटई जाते,
आई जेव्हा तिला अंथरते,
तेव्हा मात्र ती खुश असते,

अभ्यास करताना ती,
जवळ असते माझ्या,
मैत्रीण बनून माझी,
करते गोष्टी शाळेच्या,

हे तिचे महत्व,
घरात दुसऱ्या गोष्टीचे नाही,
म्हणूनच सांगते प्रत्येकाच्या घरात,
एक तरी असावी सुंदर चटई

No comments:

Post a Comment