Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, September 30, 2010

नातं तुझं माझं...


पाउस कोसळतोय वेड्य़ासारखां,
भिती वाटते बघायची,
ओळखीची एखादी सर यायची,
जवळ न करताच सोडून जायची;


एखादा थेंब छॆडतो तेव्हा,
राणी मला तुच आठवतेस,
कालचं सगळं घडल्यासारखं,
मला भूतकाळात जगवतेस;

नाही काही सांगायचं आता,
नाही काही विचारायचं,
हेच नातं तुझं माझं,
तुझ्य़ाशिवाय सगळ्य़ांना कळाय़चं;


अगदी क्षणही तेव्हा,
वेडॆ होते,
तुझ्य़ानंतरसुद्धा मला,
धरुन राहिले जे,


आठवणी मला अजुनही,
उणीव तुझी भासवतात,
वेडॆ म्हणतील लोक तुला,
असे मनाला सांगतात,


आठवणी आठवतात तेव्हा,
डॊळॆ माझॆ भरुन येतात,
वाहुन जावु नये तु त्यातुन
म्हणून आसु पापण्य़ाखाली विरघळतात;

करायचं होतं काय ,
आणि काय होउन बसलं,
नातं तुझं माझं,
आपल्या मनातचं राहिलं.. 

1 comment: