Protected by Copyscape Online Plagiarism Software

Friday, January 28, 2011

एक थेंब

एक थेंब डोळ्यातला
आज पावसाआड लपला 
रडायचे होते त्याला 
तरी खोट खोट हसला  

हृदयात कोणी नाही
म्हणून कंटाळून गेला
नवी जागा शोधताना    
डोळ्यात थांबला मेला !

डोळ्यांनाही जड झाला
तोच बाहेर पडला
स्वातंत्र्याच्या नवलाईने
थोडासा अवघडला 

दु:खात  रोजच भिजणारा   
आज पावसात भिजला
रडत  रात्री जागवणारा   
हसत  निवांत  निजला  

-       निमिष  

No comments:

Post a Comment