Protected by Copyscape Online Plagiarism Software

Tuesday, January 18, 2011

प्रणय...


शांतता असावी प्रणयातली,
स्मशानातली नकोच कधी,
दोघांनीही जाणूनबुजून जपलेली,
बंद डोळ्यात कुजबुजलेली,

आवेग असावा सुखाचा,
नको तो अश्रू यातनांचा,
विचार असावा एकमताचा,
मदमस्त त्या पवित्र रात्रीचा,

काळोखात मिठी घट्ट व्हावी,
श्वासांची हितगुज रंगावी,
बंद डोळ्यातही गाली हसावे,
प्रेम शहाऱ्यात हरवून जावे,

हवी असलेली तळमळ वेडी,
स्पंदनात ती घाई सुखाची,
जिव वेडा क्षणही तसेच,
उन्हात भासे हुरहूर पावसाची,

ओठांचा संवाद तृप्तीचा,
लाज नाचते अंगावरती,
स्पर्श सगळे बोलके बोलके,
दोघांच्याही मिठीत विरघळती,

असती क्षण जवळचे जरी,
कातरवेळी घाई मनी,
सांज जवळ येता येता,
चाहूल प्रणयाची नशील्या तनी,

सुखावते अंगांग सारे,
बेधुंदीचे शांत वारे,
गडबड श्वासांची असे चंचल,
भावनांचा मनी रोजच गोंधळ ,

विखुरलेली ती सावरते स्वतःला,
विरघळलेली सुखं मनात जपायला,

  इशारे त्यांचे दिवसा हेच सांगती,  
रात्र लवकर झोपतच नव्हती,

4 comments: