Protected by Copyscape Online Plagiarism Software

Wednesday, January 12, 2011

बाहुली...



बालपणाचा काळ गेला
बाहुल्यांचा खेळ संपला
नव्या ध्येयांनी आशानी
बाहुल्यांचा भाग घेतला

आजही त्या बाहुल्या
मैत्रिणी बनतात
किती वेळा लग्न करतात
किती वेळा भांडतात

त्यांच्या संसारात
कितीतरी वेळ गेला
परत खेळताना
ओळखतील का मला

आता हि ती बाहुली
आशेने बघते
काय सांगू मी तिला
तिचा विचार मीही करते

जेव्हा मी म्हणाले
मी तर आता मोठी झाले
अग म्हणून काय विसरायचं
अस तिने विचारले

अस कस म्हणतेस
मनात अजूनही तूच आहेस
कितीही मोठी झाली तरी
तूच माझे मित आहेस

रागवणारी ती  बाहुली नव्हती
माझे ते बालपण होते
गतकाळात जगलेले,
अतिशय नाजूक क्षण होते

आता कपाळावर,
एक टिकली होती
लहानपणी बाहुलीला,
जशी लावली होती
गळ्यात होते,
एक मंगळसूत्र
घालताना बहुलीसुद्धा,
रडली होती

आयुष्य हात पसरवून,
आज मला बोलवतेय
जायचं आहे मला,
म्हणून मीही बालपण विसरतेय
असच काहीतरी डोक्यात ठेवून
रात्र माझ्यासकट झोपी गेली

मनाच्या कोपऱ्यात,
झोपवून बालपणाला
आयुष्याची नवीन,
सकाळ झाली,


No comments:

Post a Comment