Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, January 13, 2011

ये ना तू परत......


रोखणारी पावलं, घाव घालणारी आसवं,न कळायला मी दगड नव्हतो,
आताही राणी मी तुझाच आहे ,तेव्हाही राणी मी तुझाच होतो ,

वादविवाद फारच झाले ,त्यातच कुठेतरी प्रेम हरवले ,
तिरस्कार मनात फणफणताना,सखे आपले मार्ग चुकले ,

घर मला बोचायचं नंतर ,पिल्लू  खिडकीतच ओरडायचं,
दोघांच मन फार तुटायचं,सखे फक्त तुझ्यासाठी ,

रात्र भिजायची आपली तेव्हा,आता फक्त डोळेच भिजतात,
मन सांगतं तू जवळ नाहीस,रात्रभर दोघेही तुझी  वाट बघतात ,

घड्याळाचे काटे असे टोचतील ,राणी कधीच वाटलं नव्हतं,
सेकंद काटा एकटाच फिरतो ,घड्याळ माझ्याबरोबर हे बघत बसतं,

तुझ्या वस्तु मी तशाच जपल्या ,रुमालाची तुझ्या घडी सुध्धा ,
विस्कटू नये ती आपल्यापरी ,हीच असते फक्त इच्छा ,

आरश्यासमोर सामान तुझे ,जसे होते तसेच जपले ,
त्यात तासनतास तू असायचीस ,नजरेला त्यात तेहि दिसले (आभास),

कामावर जाताना सखे ,खिडकीत नजर रोज फसते,
खिडकी नेहमी तिथेच असते,फक्त तुझे चुंबन आता नसते ,

तुझ्या आवडत्या गझली ,राणी मी परत परत ऐकतो ,
डोळे बंद करून आठवणीत ,कुशीत तुला शोधत बसतो ,

मंद दिव्याचा,त्रास रात्रीचा,आता मला होतच नाही,
नाहीस जवळ म्हणून तू कदाचीत,ते चांदणेहि बोलत नाही ,

तुझा विरह सखे ,उशीलाही जाणवला ,
मुक्या घड्यानी अंथरुणाच्या ,ध्यास तुझा लावला ,

अशी आठवतेस कधी कधी ,श्वास सुध्धा गोंधळतात ,
प्रेमाचे जुने भाव तुझे ,उजळण्याची घाई करतात ,

घटस्पोट एक विस्फोट ठरला ,तुझ्या माझ्या प्रेमातला ,
लग्न बंधनाची  साथ दिलीस,जी नको होतीस तू दयायला,

आता सखे म्हातारपण ,त्रास देतंय मला ,
दमलोय ग पळून पळून,शोधतोय खांदा रडायला ,

तुझ्या मिठीतली जाणीव ,सखे मित्रांमध्येही नाही,
गर्दीच्या मिठीत असलो तरी, आसवं माझं काही एैकत नाही,

चूक बरोबर कुणाचं काय ,घमेंडी मी सांगू कसे?,
हात पायात बळ नाही .उसणा श्वाससुध्धा आता झेपत नसे,

लाकडी खुर्चीत खिडकीत बसून ,सखे तुला शोधत असतो ,
उघडया डोळ्यात नजर नसते ,आठवणीच मोजत बसतो ,

ये ना तू परत ,तुझ्या राजाला जगवायला,
प्रेमाचा घास एखादा, प्रेमानेच भरवायला ,

कंटाळलो ग राणी मी, आसवांत भिजून भिजून ,
ये ना तू परत, मला माझ्यातच रुजवायला ,

येशील का सखे परत, वाट बघतोय ग तुझीच,
वेडावलेली नजर जणू, आईसाठी त्या पिल्लाची ,

आई कधीच गेलीय ग ,पोरकेपण नशिबी माझ्या ,
राजाला आता गरज आहे,घराची तुझ्या प्रेमाच्या ...................ये ना तू परत       

No comments:

Post a Comment