Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, January 13, 2011

आधार...


सायंकाळीच घाई असते,
अंतहीन त्या रात्रीची,
सुखे आधीच झोपलेली,
आता नजर ही मुक्तिची,

खोटा भाव हा सगळा ,
वेगळा तो न समजला कधी,
खऱ्या मरणाआधी मिळाली ,
ही सक्तीची जिवंत समाधी ,

तरीही असमाधानी मन ,
प्रवास हा निरंतर,
सफरीचे वेध हे दूरचे ,
वाट न संपे भर भर,

तरीही चालायचे असते ,
खोटया प्रेमाखातर नेहमी ,
आपल्याच दारात उभे राहायचे,
त्या अर्धनग्न भिक्षुकापरी,

आम्ही ज्यांना उभे केले ,
त्यांनीच केले निराधार ,
रक्तच आज दूर लोटते,
मागू तरी कुठे आधार ?,

खंबीर मनाकडे माझ्या,
आहे शरीर हेलकावणारे,
उडायचा विचार फार केला,
पंखच माझे थरथरणारे ,

नशिबी नसावा मुलांच्या माझ्या ,
असह्य हा प्रवास लाचारीचा,
माफ कर देवा त्याला ,
शेवट कर माझ्या यातनांचा ,
शेवट कर माझ्या यातनांचा ..........    

1 comment:

  1. Yatanancha Shewat Magun hot nahi
    Nashibhi tyala sath det nahi
    Bal milawayala jast kahi lagat nahi
    Khambir Manachi jan tula nahi

    ReplyDelete