Protected by Copyscape Online Plagiarism Software

Monday, January 17, 2011

लाट...


उमळती आठवणी अशा,
नद्याही न पुरती मला,
पाऊसही वेडा जाहला ना,
थेंबानाही वाटे व्हावेसे झरा,

इंद्र धनु उमटले आभाळी,
मेघांचाही नाच रंगला,
क्षणिक होती नववधू ती,
थरथरली भाबडी समृद्ध धरा,

सगळं सगळं सगळं आहे,
सगळचं आहे कसं म्हणू ?,
सगळं म्हणजे तीन शब्द,
फक्त “च” साठी मी किती झुरू?,

यश ,पैसा ,समृद्धी,
भरभरून आहे,
हे सगळे असून सुद्धा,
डोळ्यात किस्पट तरुण आहे,

रोमांचिले तन माझे ,
मन जाहले वेडे पिसे ,
म्हणू कारे ? मी रोम याला,
आलेत आठवणींचे नकोसे ठसे,

आनंदाने सोडले नाही कधी,
नाही विसरले मन हसायला,
गालावर असते खळी अजूनही,
घाबरते सुखच इथे रुजायला,

प्रेम,मैत्री,नाती,
समजत नाही असे नाही,
पाऊलवाट रोजचीच असते,
पण ओळखीचीच वाटत नाही,

गाणी ,कविता,भटकंती,
मस्त विरंगुळा आहेच,
मनाचं काय सांगू कुणाला?,
आठवणींनाच जे धरून आहे,

विचार करून निष्कर्ष कसला,
पापण्याआड आठवण उभीच असते,
डोळे उघड नाहीतर बंद कर,
लाटेत आठवणीच्या मन हसुनही रुसते,
         आणि कधी कधी रुसुनही हसते,         

No comments:

Post a Comment