Protected by Copyscape Online Plagiarism Software

Friday, January 14, 2011

एक सुंदर घर असावं...



मला वाटतं आकाशात,
सुंदर एखादं घर असावं,
सोन्या चांदीची इच्छा नाही ,
चंद्र ताऱ्यांच कुंपण असावं,

वेली असाव्यात तिथे देखील,
फुलांच्या मनी प्रेम असावं,
मला वाटतं आकाशात,
सुंदर एखादं घर असावं,

रोज रोज पाऊस तिथे पडावा,
मीही रोज त्यात भिजावं,
थंडुन जेव्हा घरी यावं,
तेव्हा सुर्याने मला मिठीत घ्यावं,
चंद्राने रोज गोष्टी सांगाव्यात,
चांदण्यांनी स्वतःचं स्वप्नात यावं,
मला वाटतं आकाशात,
सुंदर एखादं घर असावं,

पावसाने आपलं कारंज करावं,
सागराने स्वतःचं तळ करावं,
वेडीवाकडी वळणे घेन सुद्धा,
नदीने इथेच खेळायला यावं,
झाडं असावीत तिथेदेखील,
मुळांना रागाचं वंगण नसावं,
बहरताना झाड एखादं ,
स्वर्गाने त्यात मनापासून फुलावं,
मला वाटतं आकशात,
असं एखादं घर असावं,   

3 comments:

  1. मधुरा :
    "थंडून" - हा शब्द मी कधी ऐकला नाही. कविता छान आहे. पण हा शब्द? "भांडून" सारखा वाटतो. म्हणून खटकतो..

    ReplyDelete