Protected by Copyscape Online Plagiarism Software

Monday, January 10, 2011

अबोली...


वाटे तिच्या मनी,
वाट त्याची बघावी ,
तोच यावा स्वप्नी ,
झर जशी वाहावी,
मन भिजून जावं एकदाच,
आठवणींत ती सुद्धा फुलावी,
डोळ्यात मात्र तिच्या ,
त्याचीच मस्त नशा राहावी,

यावेत शहारे अंगावरती,
मनी मात्र तोच उमलावा,
एकटे असतील क्षण जेव्हा,
छेडणारा तो भुंगा व्हावा,
फुल बनावे तिने ,
ओठावर त्याच्या विरघळून जावे,
एकमेकांच्या  मिठीत त्यांनी,
नवीन एखादे स्वप्न विणावे,

आनंदाच्या आभाळाला त्यांच्या,
सुखाचे क्षितीज लाभो,
ओढ असावी ओढ्याची ,
प्रेमालाही पाझर फुटो,
प्रत्येक स्वप्नाचा आनंद,
प्रत्येकवेळी वेगळा असो,
प्रत्येक आनंदी क्षणाला अशी,
हजार नवी स्वप्ने दिसो,  

No comments:

Post a Comment