Protected by Copyscape Online Plagiarism Software

Sunday, January 9, 2011

हेच तर जीवन असते...



स्वप्ना बद्दल मी ,
काय सांगू राणी ,
विणता विणता स्वप्ने,
येई डोळ्यामध्ये पाणी,
एक विणलं तर,
एक उसवतं ,
माझं नशीबच सखे,
मला कितीदा फसवतं ,
उसवलेल्या स्वप्नांना ,
परत विणायचे असते 
भरलेल्या डोळ्यांनी,
गालात हसायचे असते ,
हेच तर जीवन असते ते तसेच जगायचे असते.

क्षणांक्षणांचे आयुष्य माझे,
कणांकणांनी  बनलेले ,
दुख्खाच्या काही क्षणांत ,
सुखाचे कण विणलेले ,
तरीही मी चालत असतो ,
वाटच  संपत नाही  ,
आयुष्याच्या वळणावरच्या,
गाठी माझ्याने  सुटत नाही ,
या गाठींना प्रेमानेच ,
सोडवायचे असते ,
हेच तर जीवन असते ते तसेच जगायचे असते ,

क्षण येती अनेक जीवनात ,
अनेक रंगानी बनलेले ,
थोडे रंग ओळखीचे,
थोडे अनोळख्यांनी घेरलेले ,
अनोळखी रंगांना आपणच,  
जवळ करायचं असते ,
आपल्याच एखाद्या रंगात,
विलीन करायचं असते,
कधी इंद्रधनू बनायचे असते ,
कधी पाण्यासारखे वाहायचे असते
हेच तर जीवन असते ते तसेच जगायचे असते ,

काही क्षणांत माणसे दुरावतात ,
काही क्षणांत ती जवळ येतात ,
काहींना जवळ येण्यास, 
ते प्रेमळ क्षण मिळत नसतात,
तर काही क्षणांना ,
ती वेडी माणसे मिळत नसतात,
हे आपणच  समजायचे असते ,
अन् आनंदी राहायचे असते,
भूतकाळाला विसरून,
वर्तमानात फुलायचे असते
हेच तर जीवन असते ते तसेच जगायचे असते,

सगळं कधीच,
मिळत नाही,
प्रयत्नांनी अपयश,
नेहमीच भरत नाही,
आपणच थोडंस,
खोटं आनंदून,
दुसऱ्याचाही निव्वळ,
विरंगुळा व्हायचे असते,
थोडं आपल्या मनातलं,
त्याला सांगायचे असते ,
जड झालेलं त्याचं ,
आपण ऐकायचे  असते ,
हेच तर जीवन असते ते तसेच जगायचे असते,

मरणाला मिठीत घेवून,
जगायचे असते ,
दुःखाला सुखातंच गाडून,
टाकायचे असते,
नेहमी खुश राहून,
आनंद वाटत जायचे असते ,
जीवन प्रवासात फक्त,
चालत राहायचे असते,
हसत हसत राहायचे,
रडतानाही हसायचे असते,
हेच तर जीवन असते ते तसेच जगायचे असते,

सुखाच्या पदरात,
दोन थेंब  दुख्खाचे जास्त.
बघा बाजारात,
दुख्ख किती स्वस्त ,
मन दुखेल तेव्हा ,
पावसात भिजत राहा,
अनुभवाची शिकवण घेता घेता,
सुखाचे वादळ बनून जगा,
दुसऱ्यासाठीही  कधीतरी,
जगून बघायचे असते,
हेच तर जीवन असते ते तसेच जगायचे असते       


1 comment:

  1. दुसऱ्यासाठीही कधीतरी,
    जगून बघायचे असते,
    हेच तर जीवन असते !!!

    ReplyDelete