Protected by Copyscape Online Plagiarism Software

Monday, January 10, 2011

भरारी...


चालू किती,कुठे कळेना,
नशीबंच माझे मजसाठी वळेना,
श्वास कोंडला वेडा झाला,
कासावीस मी, सांग जगू कसा ?,

प्रश्न वेगळे,उत्तर न कळे,
अश्रू साठले गोठवलेले ,
भिजवूनी डोळे ओले ओले,
असहाय्य मी, सांग जगू कसा ?,

वाटं ओळखीची तरी नवीन मला,
माझींच सावली,अनोळखी मला,
विश्वास नशीबाचा नि फाटक्या आयुष्याचा,
गोंधळलो मी, सांग जगू कसा ?,

खळी हसायची, हरवली कुठे,
गालावरती माझ्यांच अश्रूचे गोठे,
गिळू किती त्याला, नि भरू किती ?,
कोसळलो मी,सांग जगू कसा ?

उभा मी झालो मोडुनी मोडुनी ,
धीर उसना परी जाई तोही गळूनी ,
आधारासाठी भिकारडा मी जाहलो ,
निराधार मी,सांग जगू कसा ?

समजले मला आयुष्य एकदाचे ,
रडणे, हसणे भाव एकट्याचे ,
मागे फिरणे लक्षण दुबळ्याचे ,
जगायचे मला,मी उगा रडू कसा ?,

स्वप्न माळ मी परत गुंफिली ,
नशिबाची गाऱ्हाणी ही बंद केली ,
तुफानी विश्वास मनी स्वतःचा,
असूनही मी,उगा रडू कसा ?,

भिडायचे वादळाला सर्वतोपरी,
जगण्याची जिद्दच मनी वाटे बरी ,
रडुनी पार जीव कंटाळला माझा ,
हसावेसे वाटे मनी,उगा रडू कसा ?,

उडेन आभाळी दूरवरी ,
हाती न लागणाऱ्या नक्षत्रापरी ,
लाजवेन मी नशिबाला कर्तृत्वाने,
जिंकेनच मी, तर उगा रडू कसा ? तर उगा रडू कसा ?   

No comments:

Post a Comment