Protected by Copyscape Online Plagiarism Software

Monday, February 21, 2011

मोहिनी


चेहऱ्यावरच्या केसांना तुझ्या,वाऱ्याबरोबर थोडं हलावसं वाटतं ,
डोळ्यातील आनंदाला तुझ्या,माझ्या डोळ्यांना पिऊन टाकावसं वाटतं,
गालावरच्या खळीला तुझ्या,आणखी थोडं खोल व्हावंस वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

हवेला फक्त तुझ्या,शरीराभोवती वाहवसं वाटतं,
एकुलत्या एक सावलीला तुझ्या,वेड्या उन्हामध्ये खेळावसं वाटतं,
    रस्त्यावरच्या प्रत्येक कणालाही,त्याच सावलीचा भाग व्हावसं वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

किनाऱ्यावरती बसली असताना सागराच्या,त्याला तुला मिठीत घ्यावसं वाटतं,
प्रत्येकवेळी वाहत येणाऱ्या लाटांना,तुझ्यासारखाच किनारा मिळावा असं वाटतं ,
नावाडी आज वेडा माझ्यासारखा तुझा,त्याला लवकरात लवकर किनाऱ्यावर यावसं वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

तेजाने तुझ्या खुलली संध्याकाळ,तिलाही क्षणासाठी मोठं व्हावसं वाटतं,
कातरवेळी या माझ्याजवळ तू,मला या क्षणांना रोखून ठेवावसं वाटतं,
इर्षेने जळून चाललाय निसर्ग तुझ्या,त्यालाही तुला लपून बघावसं वाटतं,
मला मात्र तुझ्यासमोर बसून,तुला फक्त बघत बसावसं वाटतं,

चांदण्यांनी खुललेलं आकाश,वाकून आज तुला बघतंय,
आकाश असं का बघतंय म्हणून, धरणीचं पाखरू थोडसं लाजतंय,
वेडावलेले पाखरू हे,मलाही गुलाबी वेड लावतंय,
त्याच पाखराच्या समोर बसून मला फक्त त्यालाच बघत बसावसं वाटतं

1 comment: