Protected by Copyscape Online Plagiarism Software

Tuesday, October 26, 2010

हाक...


काहीतरी आज फार आठवले ,
पापण्याआड डोळ्यांनी मन लपवले ,
कळले नाही ते कसे ओघळले ,
होते माझे डोळे खरंच झाकलेले ,

थेंबांची आज रांग लागली ,
बंधारे नेत्रांचे रेटून वाहिली ,
मनाला बुडवूनी त्यात   ,
स्मृती मध्येच साठूनी गेली   ,

आठवण सुद्धा आज मला  ,
जुनी गोष्ट सांगू लागली ,
ती ही आज इथे रडली ,
मला सुद्धा रडवूनी गेली ,

म्हणे मला मी आठवण रे ,
माझ्यावर तू प्रेम करू नको ,
उगाच जळून जाशील रे,
दहनाचा हट्ट धरू नको,

हस तू फुलासारखा,
त्या शेंबड्या मुलासारखा ,
फुटक्या नशिबात जगलेल्या,
कावळ्याच्या पिलासारखा ,

डोळ्यातलं पाणी तुझ्या,
मनाला टोचत असेल ना ,
उगाच भावनांना तुझ्या ,
काट्यासारखं बोचत असेल ना ,

नको रडूस तू कधी ,
मी परत येणार नाही,
गालावरच्या फुलांना तुझ्या ,
वाईट काही बोलणार नाही ,

अरे तुझे आयुष्य आहे ,
बेभान उडणाऱ्या पक्षाचं,
पंखामध्ये कधीच आता,
घर नसेल तुटक्या मनाचं ,

आज तू उडून जा,
तुला पाहीजे तिथे ,
आठवणी सोडून जा ,
माझ्या घराच्या इथे ,

मी त्यांची काळजी घेईन,
तुला त्या नाही दुखावणार ,
तू हसशील परत तेव्हा ,
नेहमीसारखं नाही रडवणार,

नवे आभाळ घे अंगावर ,
धरिणीवर तू झोपी जा ,
एक स्वप्न तुटेल तेव्हा  ,
दुसरे तू स्वप्न  पहा............
 

2 comments: