Protected by Copyscape Online Plagiarism Software

Thursday, October 28, 2010

नजरकैद (भाग-२)

पाहता तुझ्या डोळ्यांत
भान माझे हरपले
सांगायचे होते काही
शब्द सारे हरवले

मनाचे मनाशीच
नाते अतूट जाहले
डोळ्यांतून पाहताना
हृदयाशी जडलेले

सुखे माझी तुझ्या
डोळ्यांत विसावली
दुःखे तुझी माझ्या
अश्रूंतून पाझरली

स्वप्न सारे माझे
तुझ्यासवे रंगले
एकाच क्षणामध्ये
परिपूर्ण जाहले  
                          -          संकेत  गुजर      

No comments:

Post a Comment