Protected by Copyscape Online Plagiarism Software

Wednesday, October 6, 2010

विरंगुळा........................




                               

जीवनाच्या खडतर प्रवासात
क्षणभर विसावा हवा
वाटेत सुखावण्यासाठी
थोडा विरंगुळा हवा

विरंगुळा असतो कणाकणात
अन् बघणार्‍याच्या दृष्टिकोनात
सुखाचे स्वप्न रंगवी
दुःखाच्या एकाकी सणात

क्षणभर सुखासाठी
ही नजर भिरभिरते
क्षणिक सुखामध्ये
ती थकवा विसरते

विरंगुळा मिळताच
उदास मनही फुलते
दुःख सारे विसरूनी
तनही हर्षुनी झुलते

क्षणाक्षणाच्या विरंगुळ्याची
आठवण मनात राहते
आयुष्याच्या प्रवासात 
शिदोरी होऊ पाहते

विरंगुळ्याची एकच झुंज
आयुष्यातील दुःखाशी
थकलेले मन माझे
सुखावले सुखाशी

    -          संकेत गुजर

No comments:

Post a Comment