Protected by Copyscape Online Plagiarism Software

Tuesday, October 12, 2010

नजरकैद...(भाग - १)


पाहताक्षणी तुजला
तुजवरी मी भाळलो
पाहून रूप साजिरे
अंतरीच रमलो  

सरसाविता तुजकडे
तू नजरेआड गेलीस
ध्यानीमनी तूच होतीस
अन् स्वप्नातदेखील आलीस

शोधण्या तुला नजर
चहुकडे फिरते
दिसता क्षणी तू
तुझ्यावरी स्थिरावते

तृप्त होईल कधी
माझे हे चातक मन
वर्षेल कधी मजवरती
तुझिया प्रेमाचे घन

पुन्हा पुन्हा भेटण्याची
आस मज लागली
चोरून मजकडे बघण्याची
अदा मनी भावली

तुझसाठी भ्रमर बनुनी
प्रेमऋतू मी देखिला
प्रेमकमलातील मकरंदाचा
स्वाद जणू चाखिला
-          संकेत गुजर

No comments:

Post a Comment