Protected by Copyscape Online Plagiarism Software

Monday, October 18, 2010

आज उमगलं......


डोळे झाकताना,
विचार आला,
नात्यांचा ,
घाबरलोच  मी ,
विचारांनी गर्दी केली ,
यावे जावे एकटेच,
मग बंध कसले ?,
फक्त बांधायचे .
गळ्याला घट्ट .
गुदमरण्यापर्यंत ,
उरले ते घाव ,
ओले !! नेहमी ओलेच  ,
तरीही दुःख नव्हते ,
का कुणाचं ठावूक?,
मनाला विचारले,
वेडे लगेच लाजले,
नात्यांचा भाग तो,
असे म्हणून हसले  ,
शक्यच नाही,
कोणते हे नाते ?,
अलगद अश्रू झेलणारे ,
घावांना प्रेमाने भरणारे,
आठवलं!!!!!!,
तेच असेल कदाचित ,
गालावर दोन फुलं,
उतावळ्या ओठांचा मोह ,
डोळ्यातली नशा,
मिठीतलं सुख ,
स्वर्गाचं पावित्र्य,
आता कळले ,
हो हेच ते नाते,
एकमेकांशी जोडलेले.
तिने माझ्याशी ,
मी तिच्याशी,
खरंच !! हेच ते,
नाते सुखाचे,
तुझे आणि माझे  
“नाते तुझे माझे”    

No comments:

Post a Comment