Protected by Copyscape Online Plagiarism Software

Saturday, October 2, 2010

परत भेटलं

कुणीतरी भेटलं मनाच्या घरातलं.
दारातलं नाही ते,नाही ते खिडकीतलं,
हे पाखरू माझ्याच मनातलं.
माझ्यासाठीच जन्मलेलं.
माझ्या गालात हसलेलं,
कधी कधी रुसलेलं,
माझं म्हणून असलेलं,
वेडं फुल हे प्रेमाच्या बागेतलं,
माझ्या मनात सुख बनून दरवळलेलं,
किती नाजूक किती सुंदर ,
मला अतिशय भावलेलं,
मला तर यानेच वेडं लावलेलं,
फार फार मला जे ओळखीच वाटलेलं,
रोजच्या भेटीत सुद्धा वेगळंच भासलेलं ,
मला आवडलेलं हे फुल ,
बागेत प्रेमाच्या हरवलेलं ,
आज परत भेटलं ,
माझं मनच शांत करून गेलं ,
वेडं कुठलं... पण मला आवडलं,
या फुलावर मी फार प्रेम केलेलं,
आज परत भेटलं,
म्हणे त्याचं(फुलाचं) मन माझ्यातच गुंतलेलं,
मग तू का मला सोडलेलं,
कोणी होतं सोडलेलं,
तुलाच या भुंग्याचं मन नाही कळलेलं,
वाटले तुला त्याने सुद्धा छळलेलं ,
म्हणून थोडं दूर जावं लागलेलं ,
डोळ्यात  पाणी घेवून माझ्या कुशीत आलेलं,
वेडं फुल माझ्यात स्वतःला विसरून गेलेलं ,
आणि मला सुद्धा विरघळवून हसलेलं,
असंच कोणीतरी भेटलं ,मनाच्या बागेतलं ........
माझंच होतं पण थोडं दूर गेलेलं.......परत भेटलं .......मला आवडलेलं......वेडं माझं फुल ते
                                                        

No comments:

Post a Comment