वाटलं होतं असंच थोडं वळून पहावं,
भुतकाळाला परत एकदा उजळून बघावं,
त्याच क्षणांना पुन्हा पुन्हा खुलून जगावं,
वाटलं होतं असंच थोडं वळून पहावं,
पावसाबरोबर ते भिजलेले क्षण आपले,
रागाबरोबर तुझ्या शिथिल झालेले उन लाडके,
एकदा तसंच लाजुन पुन्हा स्वतःशीच हसावं,
वाटलं होतं असंच एकदा वळून पहावं ,
दिवस कसे ते मोहक होते,
तिच्या माझ्या सोबतीला पूरक होते,
वास्तवालाही वाटे एक पाउल मागेच रहावं,
वाटलं होतं असंच थोडं वळून पहावं ,
क्षणानंतरच्या भेटीतही क्षणापुर्वीचं आठवणं ,
नवीन एखाद्या क्षणांत प्रेम खुळं स्वप्न पाहणं,
गालावरच्या खळीला तिच्या माझ्या डोळ्यामध्ये फुलवावं,
वाटलं होतं असंच थोडं वळून पहावं ,
वाईट कधी वाटलं नाही भूतकाळात जगताना,
मन कधी घाबरलं नाही परत प्रेम करताना,
कुणाचं होत काय चुकलं आज शोधत बसावं,
वाटलं होतं असंच थोडं वळून पहावं,
आयुष्य आहे नवीन आज,पण तिचे रुसणे नाही,
प्रत्येक सुखात खुशी आहे, मुखावर माझ्या हसणे नाही,
काय विसरलोय भूतकाळात ,त्यालाच जाऊन विचारावं,
वाटलं होतं असंच थोडं वळून बघावं..
मस्त..
ReplyDelete