Protected by Copyscape Online Plagiarism Software

Tuesday, November 16, 2010

दिवाणी............


रात्र कुरकुरली  फारच,
कुठेतरी प्रियेचे मन सुद्धा ,
येणार आहे आज राजा राणीचा ,
पेलत नाही मज भार सुखाचा ,

राजाला माझ्या काय देऊ ,
किती नटु अन् किती थटु,
जेवणात वेळ फुकट घालवू कि,
गुलाबी  स्वप्ने  रंगवत बसू,

आजही ती मखमली रात्र आठवते ,
लाजवून मला माझ्यातच भिजवते,
आवेगातील त्याची ती मस्ती वेगळी ,
फुलराणी ही नेहमी त्यातच  हरवते,

भांडणं किती एकत्र असताना,
मिटायची लगेच ओठ भिजताना,
सगळचं कसं आठवतंय आज  ,
लाजती दात अन् छेडती ओठांना,

खिडकीतून हवेचा झोत वेडा ,
छेडतो रे या सखीला तुझ्या,
तू असायचास तेव्हा तू नी मी,
फुललेली दोघांची ती रात्र प्रेमवेडी,

मनात प्रेमाचा सागर उसळतो,
तू ये ना घरी प्रिया लवकर,
या घाईत मी वेडी होईन रे ,
तृप्त कर मला तू क्षण भर,

वेडी तुझी दिवाणी मी,
तुझ्यासाठीच  आजूनही फुललेली,
कुस्करून दरवळायची घाई किती  तिची ,
      हीच शेवटची इच्छा या वेड्या फुलाची,       
       

1 comment:

  1. राम , खर सांगु !!! अवि इंडियन नेव्ही त होता आणि शिप वरती जायचा ! दोन -तिन महिन्यानातरघरी येणार असला की ह्याच भावना !!!!!!

    ReplyDelete