Protected by Copyscape Online Plagiarism Software

Monday, November 15, 2010

शिवरं...........


बाहेर शिवरणारा पाऊस,
चादरीत त्या थंडी लपलेली,
सुंदर आठवण मनात माझ्या ,
प्रेमासाठी मी जपलेली ,

काय ही तळमळ खुळी,
कुडकुडणार्‍या थंडीची ,
हुरहूर असावी मनामध्येच ,
जशी मनातल्याच आठवणींची ,

वाट बघतंय मन माझं ,
त्या वेडावलेल्या थेंबाचं,
डोळे बंद करून शोधायचो ,
गुपित मी माझ्यांच मनाचं,

घाई लागलीय मनाला ,
किनाऱ्याला गाठायची ,
होडी प्रेमाच्या शिडाची,
प्रेमविहंगातच  वाहायची ,

गडगडणारा आवाज झाला,
कोण  ? हा नवा पाहुणा आला,
काळोखी रात्रीत मुसळधार पावसात ,
हृदयाचा ठोका जरासा चुकला ,

वेडी कुठची कोण होती ,
छत्रीत सुद्धा भिजलेली,
थेंबापासून वाचवत इज्जतीला,
पावसाचीच उनाड ती सर आलेली,

आठवणींची आठवण बनून ,
मज ती बिलगलेली ,
प्रेम करते तुझ्यावर ,
असेच  वेडी म्हणून गेली,

काळोखात जी एकटीच ,
रात्रीसकट घट्ट होत गेली ,
मिठीत आली मनाच्या ,
अन् प्रेमातंच विरघळली .....
वेडी कुठली कोण होती ,,,सोडून गेली खरी... पण आठवणींचा श्वास बनून राहिली.

No comments:

Post a Comment