Friday, January 28, 2011
Wednesday, January 19, 2011
तुझ्यासाठी...
चांदणी होशील तू जेव्हा,
मी तेव्हा चंद्र होईन,
चमकत असशील आकाशात तू,
मी तुलाच बघत राहीन,
हवे असेल प्रेम जेव्हा तुला,
मी तुझा प्रियकर होईन,
प्रियसी असशील तू माझी,
तुझ्यावर प्रेम करत राहीन,
इंद्रधनू असशील तू जेव्हा,
मी आभाळ बनून राहीन,
अस्पष्ट होत जाशील तू ,
मी क्षितीज बनून राहीन,
नदीसारखी वाहशील तू,
मी किनारा बनून राहीन,
आकाश पांघरशील मेघ बनून तू,
मी पाऊस बनून राहीन,
दुख्ख होईल तुला ज्यावेळी,
मी अश्रू बनून बरसेन,
तू खुष असशील तेव्हा,
तुझ्यासाठी दुखातही हसेन,
फुलपाखरासारखी फिरशील तू ,
मी फुल बनून राहीन,
स्पर्श झाला तुझा तर,
आयुष्यभर मी कोमेजणार नाही,
वाटले तुला जर फुल व्हावेसे,
मी तुझा गंध बनून राहीन,
कितीही वेळ झाला तरी,
तुझ्या सहवासात हरवून जाईन,
त्रास होईल तुला जेव्हा,
मी दूर दूर जाईन,
मेल्यानंतर सुद्धा सखे ,
थडग्यावर तुझी वाट बघत राहीन,
...वाट बघत राहीन...
Tuesday, January 18, 2011
प्रणय...
शांतता असावी प्रणयातली,
स्मशानातली नकोच कधी,
दोघांनीही जाणूनबुजून जपलेली,
बंद डोळ्यात कुजबुजलेली,
आवेग असावा सुखाचा,
नको तो अश्रू यातनांचा,
विचार असावा एकमताचा,
मदमस्त त्या पवित्र रात्रीचा,
काळोखात मिठी घट्ट व्हावी,
श्वासांची हितगुज रंगावी,
बंद डोळ्यातही गाली हसावे,
प्रेम शहाऱ्यात हरवून जावे,
हवी असलेली तळमळ वेडी,
स्पंदनात ती घाई सुखाची,
जिव वेडा क्षणही तसेच,
उन्हात भासे हुरहूर पावसाची,
ओठांचा संवाद तृप्तीचा,
लाज नाचते अंगावरती,
स्पर्श सगळे बोलके बोलके,
दोघांच्याही मिठीत विरघळती,
असती क्षण जवळचे जरी,
कातरवेळी घाई मनी,
सांज जवळ येता येता,
चाहूल प्रणयाची नशील्या तनी,
सुखावते अंगांग सारे,
बेधुंदीचे शांत वारे,
गडबड श्वासांची असे चंचल,
भावनांचा मनी रोजच गोंधळ ,
विखुरलेली ती सावरते स्वतःला,
विरघळलेली सुखं मनात जपायला,
इशारे त्यांचे दिवसा हेच सांगती,
इशारे त्यांचे दिवसा हेच सांगती,
रात्र लवकर झोपतच नव्हती,
Subscribe to:
Posts (Atom)


